‘राम मंदिराला विरोध करणाऱ्या मुस्लिमांनी पाकिस्तानात जावे’

0

लखनऊ :

शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. ‘आयोध्येतील राम मंदिर उभारणीला ज्यांचा विरोध असेल त्यांनी पाकिस्तानात निघून जावं,’ असं वक्तव्य वसीम रिझवी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

राम मंदिर आणि बाबरी मस्जिदीप्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. येत्या ८ फेब्रुवारीपासून त्यावर सुनावणी होणार आहे. त्या आधीच वसीम रिझवी यांनी हे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले की, ज्यांचा राम मंदिराला विरोध आहे त्यांनी एक तर पाकिस्तानात किंवा बांगलादेशात जावे.

रिझवी यांनी शुक्रवारी आयोध्येतील वादग्रस्त जागेवर नमाज पढली. त्यानंतर ते रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांना भेटले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. ‘मशिदीच्या नावावर जे लोक जेहादला प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत, त्यांनी सीरियामध्ये जाऊन आयएसमध्ये भर्ती व्हावं,’ असा टोला लगावतानाच ‘रुढीवादी मुस्लिम धर्मगुरू देशाला बर्बाद करत आहेत. त्यामुळे त्यांना पाकिस्तान आणि आफगाणिस्तानात पाठवलं पाहिजे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.