मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील वावडदा येथील गर्भवती महिला  शतपावली करण्यासाठी गेलेली असतांना मद्यधुंद दुचाकीस्वाराने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना  घडली असून संबंधीत महिलेच्या कुटुंबियांनी दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोवर तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण पसरले आहे.

वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही गर्भवती महिला आपल्या मीनी आणि दीपाली या दोन्ही नणंदांच्या सोबत वावडदा ते म्हसावद या रोडवर शतपावली करत होत्या. इतक्यात सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा, ता. जळगाव) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. त्याने ज्योतीला मागील बाजूने जोरदार धडक देऊन तिला सुमारे २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात ती गंभीर जखमी होऊन तिचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. दरम्यान, संबंधीत दुचाकीस्वार हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले.

आज सकाळी ज्योती गोपाळ हीचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातून स्वीकारण्यास तिच्या कुटुंबियांनी नकार दिला आहे. संबंधीत दोषी दुचाकीस्वारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तोवर आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला असून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.