…मग गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का करावीशी वाटली नाही? ना. गुलाबराव पाटलांचा भाजपला सवाल

0

जळगाव  : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला सवाल केला. भाजपाचे नेते गोपिनाथ मुंडे यांचा अचानक मृत्यू झाला तेव्हा भाजपाला त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी असे का वाटले नाही, असा प्रश्न गुलाबराव पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या रुपात उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेता संपवला, अशी टीकाही त्यांनी केली. जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पाटील म्हणाले, राष्ट्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा कार्यक्रम माध्यमांवर मिनिट टू मिनिट दाखवला जातो. परंतु, सुशांतसिंग राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? तो दारू, सिगारेट घेणारा होता. त्याच्या बाबतीत साऱ्या गोष्टी उलगडल्या आहेत. असे असताना टीव्हीवर मात्र, चीनची बातमी दिसत नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना त्याची कधी सीआयडी चौकशीची मागणी भाजपने केली नाही. 52 टक्के रोजगार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कधी सीआयडी चौकशी होत नाही. एवढेच काय तर गोपीनाथ मुंडेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही? बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून असे राजकारण सुरू आहे. यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरू असल्याचा घणाघात देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.

गोपीनाथ मुंडेंसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला वाटले नाही. दिल्लीत 3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. मात्र ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्टने गेल्या वर्षी केला होता. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती.

दुसरीकडे खडसे आणि फडणवीस यांच्यातील युद्ध असेच चालते. पुन्हा बंद पडते. खडसे यांच्या रूपाने फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे. आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवे. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.