कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांची साथ महत्वाची !

0

पाळधी येथे जनजागृतीपर मोहिमेचा शुभारंभ

जळगाव : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था,  आदीच्या सहभागातून “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” ही मोहीम  यशस्वी करून करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून  सुरु असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ महत्वाची  असून  तरच कोरोना विरोधातील लढाईत विजय मिळणार आहे. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी  प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणे आणि कोरोनापासून दूर राहणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.ते पाळधी येथे “माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  होते.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही  मोहीम राबविण्यात येत आहे. पाळधी येथे आजपासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात मोहिमेचा शुभारंभ या माध्यमातून झाला आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी.एन. पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी पाटोळे ,जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी , तहसीलदार देवरे, दोन्ही पाळधीचे   सरपंच अलकाबाई  पाटील , आशाबाई पाटील, ग्रा पं सदस्य, आरोग्य विभागाचे  कर्मचारी आदी उपस्थिती होते.

करोनाला रोखण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’ आवश्यक

करोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वत:हून स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या मोहीमेचा हा मुख्य उद्देश आहे. करोनाला रोखण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’वर (स्वयंसुरक्षा) भर देणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी, स्वच्छता आदीबाबत स्वयंसेवकांच्या सहाय्याने जिल्हाभर जनजागृती करावी. जिल्हा  प्रशासनानेही वॉर रुम आणि इतर संपर्क यंत्रणांच्या आधारे आजारी व्यक्ती, संशयित व्यक्ती यांच्या संपर्कात राहून त्यांना योग्य माहिती द्यावी. नवरात्रीचा सणही लवकरच येत असून त्याअनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग आणि इतर दक्षतांबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

या मोहीमेअंतर्गत आरोग्य विभागाचे स्वयंसेवक हे त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, करोनाचे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे याचाही यात समावेश आहे. मधुमेह, ह्रदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य – विषयक चौकशी केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.