भुसावळ विभागात सौर उर्जा प्रकल्प

0

डीआरएम विवेककुमार गुप्ता यांची पत्रकार परिषदेत माहिती
भुसावळ (प्रतिनिधी) :
भुसावळ विभागात सौर उर्जा परियोजने अंतर्गत रेल्वे मार्गाजवळील रेल्वेच्या जागेवर सौर उर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी विभागातील मुर्तीजापूर, अकोला किवा इतर ठिकाणी योग्य असलेल्या जागांची चाचपणी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आहे. तसेच मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा मुंबई-कलकत्ता या शहरांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोण असल्यामुळे विभागातील या मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग व आरओबीच्या नुतनीकरण आगामी तीन वर्षात करण्यात येणार आहे. गाड्यांची गती 160 किमी प्रती तास वेगाने होणार असून सद्या ते नियोजन 130 किमी प्रती तास नुसार सुरु आहे. ती वाढविण्यासाठी सिग्नलिंगसाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर वर्षभरात सर्वच पॅसेंजर गाड्यांचे मेमू गाड्यांमध्ये परिवर्तन करण्यात येईल व मेेमू कारशेडची निर्मिती सप्टेंबर 2021 पर्यंत होणार आल्याची माहिती डिआरएम विवेककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील डिआरएम कार्यालयात दि. 6 रोजी 5 वा पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी डिसीएम आर.के. शर्मा, अभियंता राजेश चिखले, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी उपस्थित होते.
याशिवाय धुळे-नरडाणा या 50 कि.मी.नवीन मार्ग. भुसावळ- जळगाव दरम्यान तीसर्या व चौथ्या रेल्वे मार्गासाठी 65 कोटी. इंदुर -मनमाड नवीन मार्ग, मनमाड जळगाव थर्ड रेल्वे लांईन 205 कोटी यासह विविध विकास कामें व मोठ्या प्रमाणात निधीची तरतून अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.विभागातील भुसावळ, जळगाव, बर्हाणपुर, अकोला, मकापूर,शेगाव, नाशिक मनगाड, नांदगाव याठिकाणच्या रेल्वे जागा वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने जागांवर संरक्षण भिंती तयार करण्यात येत आहे. यापूर्वी 12ते 15 कोटी रुपयांचा खर्च झाला असून आगामी काळातही तेवढाच खर्च करण्यात येणार आहे .
मेमू ट्रेन मधून प्रवासी चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे . ही ट्रेन प्रवाश्याच्या सोई व सुविधेकरीताच केली असून मेमू ट्रैनला लावण्यात आलेल्या साहित्याची (सामानाची ) तोडफोड करून चोरी करु नये , रेल्वे ही आपलीच राष्ट्रीय संपत्ती आहे .यांची खबरदारी घ्यावी असे आवाहन डीआरएम यांनी यावेळी केले .

Leave A Reply

Your email address will not be published.