सांगलीत आणखी एका राष्ट्रवादी नेत्याची निर्घृण हत्या !

0

सांगली : सांगलीमध्ये आणखी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांची हत्त्या करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मनोहर पाटील गुरुवारी रात्री कवठेमहांकाळ तालुक्यातील देशींग येथील बोरगाव रस्त्यावर बोलत थांबले होते. त्याचवेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात मनोहर पाटील गंभीर जखमी झाले. यानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, येथील स्थानिकांनी मनोहर पाटील यांना तातडीने मिरज येथील मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. मनोहर पाटील यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांची देखील हत्या करण्यात आली होती. एकाच आठवड्यामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची हत्या झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.