भुसावळ : मतदानानंतर मतदाराचा मृत्यू

0
भुसावळ (प्रतिनिधी) –येथील लिलाव बाजारात हमाली काम करणार्या ३५ वर्षिय इसम मतदान करुन घरी परतल्यांनतर मृत्यू झाल्याची घटना दि.२१ रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील लिलाव बाजारात हमालीचे काम करणारे विजय त्रंबक तायडे (वय ३६, रा. महात्मा फुले नगर) हे सकाळी ११ वाजता मतदान करुन आले यानंतर दुपारी १.३० वाजेच्या सुमारास  अचानक त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परीवार आहे. ते येथील जगदीश त्रंबक तायडे यांचे बंधु होतेल सायंकाळी ६ वाजता त्याच्यावर अंतिम संस्कार कारण्यात येणार आहे. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.