चिखलातून मार्ग काढत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

0
जळगाव :सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बाजवल्या. मात्र , नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजविण्यासाठी खडतर रस्त्यावरुन चिखल तुडवित मार्ग काढावा लागल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे चित्र दिसून आले. त्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे सुरुवातीला मतदान केंद्रांवर निरुत्साह दिसून आला; मात्र दुपारनंतर नागरिकांची गर्दी दिसून आली.
विधानसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या अनेक उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतदान पेटीत बंद झाले. सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र ढगाळ वातावरणाचे सावट सकाळपासूनच मतदानावर होते. परिसरत गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल होत रिपरिप पावसाने हजेरी लावत उमेदवारांच्या प्रचारावरदेखील विरजन पाडले. सततच्या या रिपरिप पावसामुळे अगोदरच दयनीय अवस्था असलेल्या शहरात सर्वच रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. त्यात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. रस्त्यांसह मतदान केंद्रांच्या परीसरात झालेल्या चिखलमय अवस्थेने नागरिकांना गैरसोयिंना सामोरे जावे लागले.
तरुणांसह वयोवृध्द मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. मात्र मतदान केंद्रापर्यंत पोहचतांना सर्वांनाचा त्रास सहन करावा लागता. प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात कुठे न कुठे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. त्यात गेल्या तीन दिवसापासून रिपरिप होणाऱ्या या पावसामुळे समस्येत भर पडत या रस्त्यातून मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले आहे. अशातच वयोवृध्द मतदारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. काही वयोवृध्द मतदार हे या खड्डेमय रस्त्यातून पायी वाट काढत मतदान केंद्रापर्यंत पोहोचले, तर काहींना त्यांच्या मुलांनी दुचाकी किंवा इतर वाहनांतून मतदान केंद्रापर्यंत पोहोचविले. मात्र रस्त्याची परिस्थिती लक्षात घेत मतदान केंद्रांपर्यंत पोहोचतांना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली .

Leave A Reply

Your email address will not be published.