भडगावात एसटीची ट्रॅक्टरला धडक !

0

भडगाव-पारोळाकडून भडगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच २०. बी एल २५१६ या एसटी बसने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने अपघात झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. यात फिर्यादी जगदीश सोमनाथ मोरे (वय २७)रा खालची पेठ भडगाव आणि सफाई कामगार गोकुळ देविदास पाटील याना दुखापत झाली असून हि घटना २० ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पारोळा रस्त्यावरील राजाराम बापू मेगा सिटीजवळ रस्त्यावर  घडली असे या रस्त्यावर एसटीवरिल चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत माझ्यासोबत असलेल्या सफाई कामगार गोकुळ देविदास पाटील याच्या दुखापती व दोन्ही वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याने याबाबत भडगाव पोलिसात ट्रॅक्टर न एमएच १९. ए एल १५९४ वरील चालक जगदीश मोरे याच्याविरुद्ध भादंवि कलम २७९. ३३७. ४२७. मोटार व्हीईकल ऍक्ट १८४ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस नाईक प्रह्लाद शिंदे हे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.