शेंदुर्णीत विधनासभेसाठी ५८.२९ टक्के मतदान

0

शेंदुर्णी : जामनेर विधासभेसाठी आज झालेल्या निवडणुकीत शेंदुर्णीत शांततेत मतदान झाले मात्र दोन स्थानिक उमेदवार असतांनाही त्यामानाने मतदानाचा टक्का घटला असुन फक्त ५८.२९ मतदान झाले असुन मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पोलिस बंदोबस्त मोठा होता.

शेंदुर्णीतील दोन उमेदवार
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयदादा गरुड तर मनसेचे उमेदवार डॉ. विजयानंद कुलकर्णी हे स्थानिक उमेदवार आपले नशिब अजमावत आहे.
शेंदुर्णीत एकुण मतदान १८९०६ पैकी ११०२१ हे झाले.एकुण १७ बुथ होते.मात्र दरवेळेस असणाऱ्या मतदान केद्रा ऐवजी दुरवर मतदान केद्र असल्याने मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली .बाहेर गावी असलेले मतदार सुद्धा गावी मतदानासाठी फारच कमी प्रमाणात आले.जिल्हा परिषद उर्दु शाळेतील बुथ नंबर २३८ या ठिकाणी १४८८ मतदार असतांना फक्त एकच बुथ होते.यामुळे या बुथवर मतदारांनी मोठी गर्दी केली होती.एक ते दीड तास नंबर लागत नव्हता यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली .यामुळे संतापलेल्या काही मतदारांनी न मतदान करताच माघारी जाणे पसंत केले.रस्त्यात चिखल,मतदान केंद्रावर लाईट नाही ,जनरेटर नाही ,पिण्याचे पाणी नाही, बहुतांश शाळेतील वर्ग गळत होते ,तात्पुरती ताडपत्री टाकली होती,कुठलीही सुविधा नसल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सुर होता यामुळेच मतदानाची टक्केवारी घसरल्याची चर्चा आहे.

घटलेल्या मतदानाच्या टक्केवारी वरुन सर्वच राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्ते यांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे. यावेळी पहुरचे सपोनि राकेशसिंग परदेशी, पोउपनि.किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस होमगार्ड तसेच मुंबई व परप्रांतातुन आलेल्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला

Leave A Reply

Your email address will not be published.