भुसावळात बकरी ईद उत्साहात साजरी

0

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील खडका शिवारातील प्रमुख नवीन ईदगाह मैदानावर आज दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी ८-३० वाजता हजारो मुस्लिम बांधवांनी मौलाना रेहान रजा यांच्या मागे उभे राहून बकरी ईदची नमाज अदा करून एकमेकांची गळाभेट करून ईदच्‍या शुभेच्छा दिल्या.

ईदगाह मैदानावर आ.संजय सावकारे,नगराध्यक्ष रमण भोळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड,बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार, भाजपा गटनेता हाजी मुन्ना तेली, हाजी आशीक खान,हाजी साबीर शेख,दिव्यांग भोळे,खडक्‍याचे माजी सरपंच भैय्‍या महाजन,पोलीस पाटील सुरजसिंग पाटील,शब्बीर बागवान,एमआयएम तालुकाध्यक्ष फिरोज खान, शहराध्यक्ष अशरफ,तडवी, माजी सैन्य अधिकारी जे.एस.पठाण,उसामा खान, ईदगाह कमिटीचे डॉ.रफिक अहमद,अल्लाबक्ष शहा,हाजी रहीम शहा,साजिद खान,तसलीम पहेलवान,हाजी तसलीम,फिरोज खान,गुलाम यासीन,शेख इक्बाल आदी उपस्थित होते. दरम्‍यान सकाळी जुनी ईदगाह,जाम मोहल्ला, गौसिया नगर, नुरानी, मरकज, हिंदुस्तानी, पंजाबी, अन्सारउल्ला, बिलाल आदी मशिदींमध्ये सुद्धा सकाळी नमाज अदा करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.