…अखेर महावीर फोगटसह बबिताने केला भाजपमध्ये प्रवेश

0

नवी दिल्ली : राष्ट्रकुल पदक विजेती कुस्तीपटू बबिता फोगट आणि कुस्तीपटू महावीर फोगट यांनी अखेर आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री किरेण रिजजू यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात त्यांनी आज पक्ष प्रवेश केला.फोगट भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या त्यावर आज अखेर शिक्‍कामोर्तब झाला आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर महावीर फोगट आणि बबिता फोगट यांनी केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांची भेट घेतली.

केंद्रासह राज्य सरकारचे कौतूक करत महाविर फोगट यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कालच एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. तसेच आपल्यासोबत बबितादेखील पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. दरम्यान, बबिताच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत. बबिताने हरयाणा पोलीस दलातील निरीक्षक पदाचा राजीनामा दिल्याचे फोगाट कुटुंबाने सांगितले. महावीर यांनी याआधी जननायक जनता पार्टीसाठी काम केलं आहे. जेजेपीच्या क्रीडासंबंधित विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. फोगाट कुटुंब दादरीतील बलाली गावात वास्तव्यास आहे. भाजपा प्रवेशानंतर बबिताला विधानसभा निवडणुकीत बाध्रा किंवा दादरी मतदारसंघातून तिकीट दिले जाण्याची शक्‍यता आहे

Leave A Reply

Your email address will not be published.