भुसावळात दोन गावठी कट्टयासह आरोपी जेरबंद

0

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळ | प्रतिनिधी
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरातील मुस्लिम कॉलनी येथे मंगळवार ३ रोजी दुपारी कारवाई करीत दोन गावठी कट्टयासह एकाच्या मुसक्या आवळल्या .
या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
आरोपी सैयद कलीम सै.जावीद (२१)रा. मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ याच्या ताब्यातून 40 हजार रुपये किंमतीचे दोन कट्टे जप्त केले.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने
जप्त केले असून यांप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे .
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शरीफोद्दीन काझी, नाईक शेख युनूस शेख रसुल, महेश आत्माराम महाजन आदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.