भारतात पहिल्यांदा महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त, NFHS ने जाहीर केली आकडेवारी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हे’ने (NFHS) दिलेल्या ताज्या माहितीनुसार आता आपल्या देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. सर्वेक्षणातल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या एक हजार पुरुषांमागे 1020 महिला आहेत. याशिवाय एकूण जन्मदरातही घट झाल्याचं सर्वेक्षणात म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुधवारी (24 नोव्हेंबर) ही आकडेवारी जाहीर केली. एनएफएचएस हे एक व्यापक प्रमाणावर केलं जाणारं सर्वेक्षण आहे. यामध्ये देशातल्या प्रत्येक कुटुंबाची माहिती गोळा केली जाते.

एनएफएचएसच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं, की भारतात महिलांची संख्या वाढत आहे. यापूर्वी परिस्थिती काहीशी वेगळी होती. 1990 मध्ये 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या फक्त 927 एवढी होती. 2005-06 मध्ये झालेल्या तिसऱ्या एनएफएचएस सर्वेक्षणात हे गुणोत्तर 1000-1000 असं बरोबरीत आलं होतं.

त्यानंतर 2015-16 मध्ये झालेल्या चौथ्या सर्वेक्षणात ही आकडेवारी पुन्हा घसरली होती. त्या वेळी 1000 पुरुषांच्या तुलनेत 991 स्त्रिया होत्या. आता करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली आहे.

NASA ने पहिल्यांदा शेअर केला अद्भुत फोटो महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं वाटचाल देशात सध्या जन्म लिंग गुणोत्तर अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जनगणनेतून हे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. सध्याची आकडेवारी पाहता महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचं दिसत आहे.

आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक विकास शील यांनी दिली. एनएफएचएसमधली इतर आकडेवारी सर्वेक्षणातल्या आकडेवारीनुसार, सध्या (2019-21) 15 वर्षांखालच्या लोकसंख्येचा आकडा 26.5 टक्क्यांवर आला आहे. 2005-06 मध्ये 15 वर्षांखालची लोकसंख्या 34.9 टक्के इतकी होती. टक्केवारीमध्ये काहीशी घट झाली असली तरी भारत अजूनही तरुण राष्ट्र आहे.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 नुसार, महिलांचं अपत्यांना जन्म देण्याचं प्रमाण 2.2 वरून 2 वर आलं आहे. गर्भनिरोधकांच्या प्रसाराचा दरही 54 टक्क्यांवरून 67 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. वाचा : शारीरिक नव्हे मानसिक आजाराचं दुखणं; ‘या’ वेदना म्हणजे Physical stress symptoms डेटा स्केल एनएफएचएस-5 सर्वेक्षणामध्ये गोळा करण्यात आलेला डेटा 2019-20 या वर्षांतला आहे. 2019-20 या काळात सुमारे 6.1 लाख घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. एनएफएचएस-5 मध्ये या वेळी प्री-स्कूलिंग, अपंगत्व, शौचालय सुविधा, मृत्यू नोंदणी, मासिक पाळीच्या दरम्यान आंघोळ करण्याच्या सवयी, आणि गर्भपाताच्या पद्धती व कारणं या नवीन घटकांचा समावेश करण्यात आला होता. पहिलं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-1) 1992-93 मध्ये करण्यात आलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.