भातखेडे मायनर पाट चारी दुरुस्त केल्यास अनेक शेतकऱ्यांना पाटाच्या पाण्याच्या फायदा होणार ?

0

निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) गेल्या दोन वर्षांपासून गिरणा धरण शंभर टक्के भरत असल्याने पाट बागायती करण्यासाठी शेतकरी वर्गात उत्साह संचारला आहे मात्र पाट चाऱ्या ना दुरुस्त असल्यामुळे तसेच चारींमध्ये काटेरी झुडपे झाल्यामुळे पाटाचे पाणी शेता पर्यंत पोहचत नाही त्यामुळे धरण भरुनही पाटाच्या पाण्याच्या फायदा शेतकऱ्यांना घेता येत नाही गेले ५ – ६ वर्ष गिरणा धरणाला पाणी न आल्यामुळे पाट चाऱ्यांची अवस्था खराब झाली होती तसेच काही शेतकऱ्यांनी पाट चाऱ्या मोडून शेती काढून घेतली आहे त्यामुळे पाट बंधारे विभागाने लक्ष घालणे तेवढेच गरजेचे आहे अनेक ठिकाणी पाट चाऱ्या फुटलेल्या आहेत त्यामुळे बागायतीसाठी पाटाचे पाण्याचे फार्म भरण्यास शेतकरी पुढे येत नाहीत भातखेडे मायनर पाट चारी दुरुस्त करून दिल्यास निपाणे ताडे आनंद नगर भातखेडे गालापूर या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांना पाट बागायती करता येईल अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे आ, चिमणराव पाटील यांच्या कडे तापी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद आहे त्यांनी लक्ष दिल्यास अनेक शेतकऱ्यांना पाटाच्या पाण्याच्या फायदा होणार आहे तरी चिमण आबांनी लक्ष घालून भातखेडे मायनर चारीची समस्या कायमची सोडवून द्यावी अशी मागणी पाट बागायती पासून वंचित असलेल्या शे केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.