राजस्थानातील 8 शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय

0

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसतो आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशानंतर आता राजस्थान सरकारनेही खबरदारीचे उपाय घेण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानातील 8 शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह मास्क न घातल्याबद्दल दंड वाढवून 500 रुपये केला आहे. तर राजधानी जयपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी रात्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग सर्वात जास्त असलेल्या 8 जिल्ह्यांच्या (जयपूर, जोधपुर, कोटा, बीटेकर, उदयपुर, अजमेर, अलवर आणि भीलवाड़ा) शहरी भागात बाजारपेठा, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स आणि अन्य व्यावसायिक संस्था सात वाजेपर्यंतचं सुरु राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.