भाजप-शिवसेना युतीची घोषणा आज होणार ?

0

मुंबई : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची आघाडी आणि जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला आहे. मात्र, विधासभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाची चर्चा अद्यापही पूर्ण झालेली नाहीये. आज हे दोन्ही पक्ष युतीचा निर्णय जाहिर करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात युती होणार की नाही? युती झाली तर कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार? यासारख्या अनेक प्रश्नांवर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचं वेळापत्रकही जाहीर केलं आहे मात्र, अध्यापही युतीची घोषणा झालेली नाहीये. शिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युलावर ठाम आहे तर भाजपला अधिक जागा हव्या आहेत. या चर्चा सुरु असतानाच शिवसेना-भाजपमधील जागावाटपावरुन अनेक फॉर्म्युला समोर आले होते. मात्र अद्याप तरी दोन्ही पक्षांतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.