भाजप नेते चिन्मयानंदांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला अटक !

0

शाहजहांपूर: माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला आज, बुधवारी एसआयटीनं खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली. विद्यार्थिनीला तिच्या घरातून अटक करण्यात आली आहे.

विद्यार्थिनीच्या वकिलाचा आरोप आहे की, एसआयटीने मुलीला चप्पलही घालू दिली नाही आणि जबरदस्ती ओढत रुममधून बाहेर नेत अटक करण्यात आली. मंगळवारी स्थानिक न्यायालयाने मंगळवारी विद्यार्थिनीची अटकपूर्व जामीन याचिका स्विकारली होती, पण अटकेवर स्थगिती आणण्यास नकार दिला होता. उत्तर प्रदेशचे डीजीपी ओपी सिंह यांनीदेखील अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं आहे. विद्यार्थिनीवर आपल्या मित्रांसोबत मिळून चिन्मयानंद यांच्याकडून पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.