भाजप महिला नेत्याकडे कोकेन सापडले ; पोलिसांकडून अटक

0

कोलकाता | कोलकाता पोलिसांनी 19 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या पर्यवेक्षक आणि हुगळी जिल्ह्याच्या भाजपा महासचिव पामेला गोस्वामी आणि त्यांच्या मित्राला अटक केली आहे. त्यांच्यावर ड्रग्स बाळगण्याचे आरोप आहेत. त्यांच्याकडे 100 ग्रॅम कोकेन सापडल्याचे बोलले जात आहे. दोघे बऱ्याच काळापासून अमली पदार्थांच्या ड्रग्स विक्री व्यवसायामध्ये सामील असल्याचे कोलकत्ता पोलिसांनी म्हटले आहे.

 

(19 फेब्रुवारीला) पोलिसांना काही सूत्रांच्या हवाल्याने याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पामेला यांना अटक केली. भाजपच्या नेत्या असल्याने त्यांना केंद्रीय सुरक्षा बलाची सुरक्षा मिळालेली होती. ज्यावेळी त्यांना अटक केली, त्यावेळी सुरक्षा रक्षक त्यांच्या गाडीमध्ये होता. पोलिसांच्या 8 गाड्यांनी त्यांचा पाठलाग करून पामेलाची गाडी अडवली होती. त्यानंतर त्यांची गाडी थांबवून विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडविचे उत्तरे दिली. यामुळे पोलिसांचा संशय अजूनच बळावला. तेव्हा कार आणि त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यांना कोकेन सापडले.

 

पोलिसांनी चेकिंगसाठी न्यू अलीपुर येथे रोडवरच पामेला यांची गाडी अडवून गाडी तपासली. यानंतर त्यांच्या बॅगमध्ये आणि कारमध्ये 100 ग्रॅम कोकेन सापडले. कोकेन सोबत इतर अमली पदार्थही सापडल्याचे बोलले जात आहे. बाजारामध्ये 100 ग्रॅम कोकेनची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.