विवरे जवळील रिक्षा अपघातात महिला ठार, दोन जखमी

0

रावेर (प्रतिनिधी): विवरे खुर्द बसस्टँड जवळ चालत्या रिक्षा समोर कुत्रा आल्याने व रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात रिक्षा चालकाचा तोल गेल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाला आदळल्याने झालेल्या अपघातात विवरे खुर्द येथील आझाद नगरच्या रहिवाशी सगीराबी शे शकूर ( वय ४९ ) यांचा मृत्यू झाला. तर सोबत असलेल्या यासमीनबी शेख फरीद व नजमानबी  फैजपुर येथुन नातेवाईकांकडून लग्न आटोपून रिक्षाने घरी येतहोत्या.

 

रावेर येथील रिक्षा क्र एमएच १९ ए ई ६६८६या रिक्षाने फैजपुर येथून रावेर कडे येत असतांना विवरे खुर्द बस स्थानका जवळील रस्त्यावर खड्डा असल्याने तसेच समोर कुत्रा आल्याने त्याला चुकविण्याच्या नादात रिक्षाचालकाचा तोल गेल्याने रिक्षा चिंचेच्या झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात विवरे बु॥च्या आझाद नगर मधील रहिवाशी सगीराबी शे शकूर (वय ४९) यांचा मृत्यू झाला. तर रिक्षात सोबत असलेल्या यासमीन बी शे फरिद व नजमाबी शे हाफीस खा गंभीर जखमी झाल्या असुन फैजपुर येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. सदर घटना दुपारी १ .३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रिक्षाचालका विरुध्द निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

विवरे गावाजवळ दुतर्फा बाजून साईडपट्टया नसल्याने व रस्त्यात खडडे असल्याने अनेक अपघात होतात.विवरे बु॥ व विवरे खुर्द गावातील जि प मराठी शाळा, उर्दू शाळा, हायस्कूल मध्ये जाण्यासाठी शाळेतील विदयार्थांना रस्ता ओलांडून जावे लागते . यामुळे अनेक अपघात झाले असुन जिवीत हानी झालेली आहे. या ठिकाण अपघात टाळण्यासाठी विवरे खुर्द बसस्टँङ जवळ गतिरोधक करण्यात यावे. तसेच विवरे बु॥ येथील पुला जवळ , सोनाली तोल काटा, पोलीस चौकी तसेच अजंदा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत गतिरोधक बनवावे. दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल. असा इशारा विवरे बु॥चे सरपंच युनुस तडवी यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.