भरदिवसा २० शेळया लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बोदवड शहरातील जामठी रोड परिसरातून भरदिवसा ४ शेतकऱ्यांच्या १८ ते २० शेळया चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड शहरातील प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील जामठी रोड परिसरातून भरदिवसा दुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने १८ ते २० शेळया चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.  शेख रहीम, इमरान पटवे खलील मन्यार, एकनाथ बोदडे, बाळू माळी यांच्या मालकीच्या या शेळ्या होत्या. शेळी चोरीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, रात्रीच्या सुमारास एक बुलेटही चोरांनी लांबविली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.