पालकमंत्र्यांच्या हस्ते सावदा येथील खंडेराव मंदिर देवस्थानच्या सभामंडपाचे भूमिपूजन

0

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील भाविकांच्या नवसाला पावणारे जुने खंडोबा माणसाला व बानु देवी यांचे मंदिर आहे.  दरवर्षी चंपाषष्ठीला येथे यात्रा भरत असते, या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येत असताना सभामंडप नसल्यामुळे भाविकांना त्रास होतो.  याबाबत शहरातील नागरिकांनी ही बाब मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी खंडेराव मंदिर संस्थान करिता सभामंडप बांधकामासाठी जिल्हा नियोजन मंडळात अध्यक्ष असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निधी मंजूर करून दिला.

या सभामंडपाच्या भूमिपूजनाचा भूमिपूजन शिवसेना नेते पाणीपुरवठामंत्री तथा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते मुक्ताईनगरचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू बंगाळे यांच्या उपस्थितीत रविवार सकाळी नऊ वाजता आठवडे बाजारातील खंडोबा देवस्थान येथे संपन्न होत आहे, तरी सावदा शहरातील नागरिक बंधू भगिनींनी व देवस्थानची संबंधित असलेल्या सर्व नागरिकांनी कार्यक्रमात उपस्थित रहावे असे आवाहन खंडोबा देवस्थान संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.