भडगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच ; हल्ल्यात गाय ठार

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव शिवारात एरोंडोल रस्त्यावर गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. यामध्ये त्याने गाई, म्हशी, कुत्रे, रानडुक्कराना ठार केल्याची घटना ताजी असतानाच बिबट्याने आता शिवार तोच पण रस्ता बदललेला असून आता त्याने पिंपळगाव रस्त्यावरील शेतात बांधलेल्या गाईला ठार केल्याची घटना दि 27 शनिवार रोजी मध्यरात्री घडली आहे.

पिंपळगाव रस्त्यावर विनोद राजाराम पाटील यांच्या  शेतात बांधलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना दि.27 रोजी रात्री घडली आहे. या बाबत परिसरातील शेतकरी वर्गात व जवळच पेठ भागातील रहिवासी मध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण पसरले असून या बिबट्याला लवकर जेरबंद करण्याची मागणी होत आहे.शहरातील विनोद राजाराम पाटील  रा.पेठ यांचे शेत आहे. यामध्ये त्यांनी मका लावलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी आपली एक गाय, पत्र्याच्या शेडच्या बाजूला बांधले होते. दि.27 रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याने बांधलेल्या गाईवर हल्ला करत ठार मारले व पोट फाडून त्यातील मास खाल्ले.

या बाबत शेतकरी विनोद पाटील यांचे वडील हे सकाळी शेतात गेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. या अगोदर अनेक वेळा वनविभागाला माहिती देण्यात आली होती. त्याच वेळी वनविभागाने सापळा रचून बिबट्याला जेरबंद केले असते तर आज गाईचे प्राण वाचले असते. तसेच या    ठिकाणावरून भडगाव शहरातील पेठ भाग हा जवळ असल्यामुळे या भागातील रहिवासी व शेतकरी यांच्या मनात दहशत निर्माण झाली असून लवकरच बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.