ही सुंदर नदी…मला सामावून घेईल म्हणत तरुणीची नदीत उडी मारुन आत्महत्या ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

0

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये २३ वर्षीय तरुणीने साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयेशा असं या तरुणीचं नाव असून आत्महत्येआधी तिने आपल्या फोनवर व्हिडीओ शूट केला होता. भावूक झालेली आयेशा व्हिडीओमध्ये आपण आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी इतर कोणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. आयेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खळबळ माजली आहे.

 

आयेशाचा मृतदेह पोलिसांना सापडला असून याप्रकरणी तिच्या पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशाचे वडील लियाकत अली यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, “आयेशाचा २०१८ मध्ये राजस्थानमधील आरिफ खानसोबत विवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी हुंडा मागण्यास सुरुवात केली होती. मी त्यांना काही पैसे दिले होते, पण त्यांच्या मागण्या संपत नव्हत्या. काही दिवसांपूर्वी भांडणानंतर आरिफने आयेशाला घरी पाठवलं. त्याने तिच्याशी फोनवरुन बोलणंही बंद केलं होतं. या वेदना सहन होत असल्यानेच तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला”.


 

दोन मिनिटांच्या व्हिडीओत तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्य नेटकऱ्यांना भावू करत आहे. आपली ओळख करुन देताना आयेशा आपल्या मनातील दु:ख बोलून दाखवत आहे. “मी जे काही करण्यासाठी जात आहे त्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही. देवानेच आपल्याला इतकंच आयुष्य दिलं होतं असं समजा,” असं आयेशा सांगताना दिसत आहे.
व्हिडीओच्या शेवटी आयेशा म्हणत आहे की, “ही सुंदर नदी…ही मला सामावून घेईल अशी प्रार्थना करते. मी हवेप्रमाणे आहे, मला सतत वाहायचं आहे”.

Leave A Reply

Your email address will not be published.