भडगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूकिचा ‘बिगुल’ वाजला

0

भडगाव | प्रतिनिधी
भडगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2020 ही नुकतीच जाहीर झाली असून प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया पार पडली असून दि.16 रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या आजी-माजी व इच्छुक उमेदवारांची धाम धूम सुरू झाली आहे प्रत्येक उमेदवार हा आपला सुरक्षित वॉर्डाची चाचपणी करीत आहे. तर काही इच्छुक दोन-तीन वार्डात आपल्याच घरातील उमेदवारी ची इच्छा व्यक्त करून पक्षाचे तिकीट आपल्यालाच फायनल आहे असे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
इच्छुकांची भाऊगर्दी वाढली
भडगाव नगरपरिष 2020 च्या नवीन प्रभाग रचनेनुसार एकवीस प्रभाग आहेत. या 21 जागांमधून 11 महिला आरक्षण असून 10 पुरुष असतील पण निवडणुकीच्या या वातावरणात जे इच्छुक उमेदवार कधीही आपल्या वार्डात गावात दिसत नव्हते ज्यांनी कधीही सामाजिक कामात किंवा राजकीय कामात आपला मोलाचा वाटा दिला नव्हता असे उमेदवार गल्लीगल्लीत फिरताना बघायला मिळत आहेत तरी जो उमेदवार आपल्या वार्डात व मतदारांना पूर्णवेळ देईल त्यांनाच आम्ही निवडून देऊ असं मतदारांची मानसिकता बघायला मिळत आहे
सोशियल मीडिया बनले प्रचाराचे माध्यम
भडगाव नगरपालिका केला निवडणुकीला काहीकाळ बाकी असून सध्या व्हाट्सअप फेसबुक याद्वारे इच्छुक उमेदवार आपले शहरात केलेले सामाजिक कार्य तसेच निवडून आल्यानंतर कुठले कार्य तसेच करणार आहेत याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करत आहे तसेच व्हिडिओ क्लिप बनवून हे सुद्धा फिरत आहेत परंतु सुज्ञ जनता सोशल मीडियाद्वारे आपल्या कामांचे प्रसार करणाऱ्या चमको उमेदवाराला कौल देईल की खर्‍याखुर्‍या विकासकामांना चालना देणाऱ्यांना निवडून देईल? त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.