Coronavirus : पंतप्रधान मोदी यांनी ठाकरेंशी केली फोनवर चर्चा?

0

मुंबई: पुणे, मुंबई, नागपूर व औरंगाबाद या ठिकाणी कोरोनाग्रस्त आढळले आहे. महाराष्ट्रची कोरोनाग्रस्तची संख्या ३२ वर पोहचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच करोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राकडून सर्वोतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासही त्यांनी दिलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्ये आज दुपारी बोलणं झालं. सुमारे पंधरा मिनिटं या दोघांमध्ये बोलणं झाल्याचं सांगण्यात येतं. यावेळी मोदींनी राज्यातील करोनाची लागण झालेले रुग्ण, संशयित रुग्णांची माहिती घेतली. तसेच राज्य सरकारने बनविलेले विलगीकरण केंद्रांची माहिती घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनीही राज्य सरकारने करोना रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची पंतप्रधानांना माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.