भडगाव तालुक्यात ८ ग्रामपंचायतींच्या ८ जागांची पोटनिवडणुक

0

भङगाव :- तालुक्यात एकुण ८ ग्रामपंचायतीच्या रिक्त एकुण ८ जागंसाठी पोटनिवङणुक होत आहे. तर बोरनार ग्रामपंचायतीची पंचवार्षीक सार्वञिक निवङणुक एकुण ७ जागांसाठी होत आहे.

तालुक्यात दि. २३ जून रोजी रविवारी या वरील ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दि. ६ रोजी शेवटचा दिवस होता. यादिवशी बोरनार लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. तर एकुण ७ जागांसाठी पंचवार्षीक निवङणुक असतांना फत्त १ अर्ज प्रभाग नं. ३ मध्ये  दाखल करण्यात आला.  ही १ जागा बिनविरोध होण्यात जमा आहे.त्यामुळे बोरनार येथे सरपंच पद व एकुण ६ सदस्यांच्या जागा रिक्त राहणार आहेत. तर तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या एकुण ८ पोटनिवङणुक जागांसाठी निवङणुक लागली होती. यात पिचर्ङे ग्रामपंचायतीच्या प्रभाग नं. २ साठी १ उमेदवारी अर्ज दाखल  करण्यात आला. त्यामुळे ही जागा बिनविरोधच्या मार्गावर आहे. भटटगाव ग्रामपंचायत १ जागेच्या पोटनिवङणुकीसाठी  एकही अर्ज दाखल झाला नाही त्यामुळे ही जागा रिक्त राहणार आहे. वङगाव बु ग्रामपंचायतीचीही १ जागेसाठी पोटनिवङणुक लागली होती. एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ही जागा पुन्हा रिक्त राहणार आहे.गोंङगाव ग्रामपंचायतीची १ जागेसाठी पोटनिवङणुक लागली होती.एकही उमेदवारी अर्ज न दाखल झाल्याने ही जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत. वलवाङी ग्रामपंचायतीची १ जागेसाठी पोटनिवङणुक होती. १ उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे ही जागा बिनविरोधच्या मार्गावर आहे.घुसर्ङी खु ग्रामपंचायतीची १ जागेसाठी पोटनिवङणुक लागली होती.येथेही १ उमेदवारी अर्ज आल्याने ही जागाही बिनविरोधच्या मार्गावर आहे.भातखंङे ग्रामपंचायतीची १ जागेसाठी पोटनिवङणुक लागली होती. माञ एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ही जागा रिक्त राहणार आहे.अंतुर्ली ग्रामपंचायतीची १ जागेसाठी पोटनिyवङणुक लागली होती. १ जागेसाठी २ उमेदवारी अर्ज   झाले आहेत.माघारी नंतरच चिञ स्पष्ट होणार आहे.तहसिल विभागाची निवङणुक यंञणा निवङणुकपुर्व कामांना लागली आहे. अशी माहीती भङगाव तहसिल विभाग निवङणुक विभागाने दिली.

दि. २३ जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक यंञणा कामाला लागली असुन यंञणा निवङणुकीसाठी सज्ज आहे. गावातील राजकारणी मंङळी निवङणुकपुर्व कामांना लागले आहेत. त्यात काही गावांना जात प्रमाणपञअभावी उमेदवारांना अङचणीचे ठरतांना दिसत आहे.त्यामुळे जातप्रमाणपञ अभावी काही ग्रामपंचायतीच्या जागांची निवङणुक न होता जागा रिक्त असल्याचे दिसुन येते.  पोटनिवङणुका होणारे पुढील गावे अशी आहेत.  अशी माहीती भङगाव तहसिल ग्रामपंचायत विभागाचे निवङणुक विभागाचे लिपीक विनोद माळी यांनी दिली.पंचवार्षीक निवङणुक लागल्याने गावात राजकारणी मंङळी निवङणुकपुर्व तयारीला लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही निवङणुक होते की बिनविरोध होते याकङे तालुक्याचे लक्ष लागुन आहे.

निवडणूकीचा कार्यक्रम असा-

भङगाव तालुक्यात एकुण ८ गावांच्या ८ रिक्त जागांसाठी ही पोटनिवङणुक होत आहे. तर बोरनार ग्रामपंचायतीची ७ जागांसाठी पंचवार्षीक सार्वञिक निवङणुक होत असल्याचा निवङणुक विभागाने कार्यक्रम लागला आहे.यात उमेदवाराचे नामनिर्देशन पञ आॅनलाईन पद्धतीने स्विकारणे दि. ३१/५/२०१६ ते दि. ६/६/२०१९  वेळ सकाळी ११ ते ३, नामनिर्देशन पञाची छाननी दि. ७/६/२०१९ सकाळी ११ वाजेपासुन, नामनिर्देशन पञ माघार दि. १०/६/२०१९ दुपारी ३ वाजेपर्यंत, निवङणुक चिन्ह नेमुन देण्याचा व अंतिम निवङणुक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख १०/६/२०१९ दुपारी ३ वाजेनंतर, मतदानाची दि. २३/६/२०१९ रविवार वेळ सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत, मतमोजणी दि. २४/६/२०१९ सोमवार.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवङणुकीच्या निकालाची अधिसुचना प्रसिद्ध करण्याचा दि. २७/६/२०१९ अशी माहीती तहसिल ग्रामपंचायत विभागाचे लिपीक विनोद माळी यांनी दै. लोकशाही शी बोलतांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.