उद्धव ठाकरेंबरोबर खासदार जाणार 16 जून रोजी अयोध्येत

0

मुंबई :-  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला 16 जून रोजी जाणार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही राहणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार हे आधीच ठरलं होतं. मात्र त्या दौऱ्याची तारीख समोर आली नव्हती. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

यापूर्वी, लोकसभा निवडणुक संपताच शिवसेनेने  राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून ‘रामाचे काय होईल’ असा अग्रलेख लिहण्यात आला होता. शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात लिहिले आहे की, ‘काँग्रेस राज्यात राम अंधारात होते. अयोध्येत दिवाळी साजरी करण्यापासून तुम्हाला कोणी रोखले होते?’’ असा कडक सवाल पंतप्रधान मोदी यांनी काशीला जाऊन विचारला. प्रश्न खरा आहे. अयोध्येत आता दिवाळीच होईल. रामाचे काम अयोध्येत आणि देशात सर्वत्र होईल. हाच जनादेश आहे.’ असेही या अग्रलेखात लिहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.