भडगावात “माऊली”च्या 1300 वृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ

0

भडगाव (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असतानाच निसर्ग संवर्धनाच्या कार्यातही आपला वाटा उचलणाऱ्या माऊली फाउंडेशन च्या वतीने  नुकताच 1300 वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. निमीत्त होते ते फाउंडेशन चे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या मुलीच्या 13 व्या वाढदिवसाचे…!!! याप्रसंगी फाउंडेशन चे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, करिमा खान, अजित दुडे, झाकीर कुरेशी, जयेश मराठे, प्रा.सुरेश कोळी उपस्थित होते.

गेल्या 5 वर्षात फाउंडेशन ने 2 हजार पेक्षा अधिक झाडे भडगाव आणि परिसरात लावली. आणि ती जगवलीही. यावर्षीच्या वृक्षारोपण अभियानाला वाक रस्ता, पेठ चौफुली पासून सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिकाधिक ऑक्सिजन देणारी वड, पिंपळ, कडुनिंब ही देशी वृक्ष लावली जाणार आहेत. यावर्षी वाक रस्त्याच्या दुतर्फा तसेच शहरातील मोकळी मैदाने यांच्या सभोवती, निवडक शाळांमध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे. यासाठी अनेक वृक्षप्रेमी पुढाकार घेत आहेत.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश शिंपी, डॉ.निलेश महाजन, प्रतिभा कुळकर्णी, शोभा महाजन, सीमा महाजन, संजय सोनार, राहुल पाटील, संदीप नरवाडे, हेमंत खैरनार, व देवेंद्र पाटील, एकनाथ पाटील परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.