तिवसा येथील शिवसेना शहर प्रमुखाच्या हत्येची अटक केलेल्या आरोपींकडून कबुली

0

तिवसा (प्रतिनिधी) : अमरावती नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या तिवसा येथील आशीर्वाद वाईन बार समोर शनिवारी 26 जुन रोजि रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास तिवसा शिवसेना शहर प्रमुख अमोल जनार्दन पाटील वय 38 वर्षे  यांची डोळ्यात मिरची पूड टाकून निर्गुण हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने  तिवसा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .

याप्रकरणी तिवसा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून एक आरोपी मात्र  अध्याप ही फरार  आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप रामदास ढोबाळे वय 42 वर्षे, प्रवीण रामदास ढोबाळे वय 40 वर्षे ,प्रवीण उर्फ अविनाश एकनाथ पांडे वय 30 वर्षे, रुपेश घागरे वय 22 वर्षे, राहणार सर्व तिवसा याचा समावेश आहे . तर गुणवंत ऊमप वय 30 वर्षे .रा कमळापुर हा फरार आहे. जुन्या वादातुन हे हत्याकांड घडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे .

पोलिसांनि दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री अमोल पाटील आपल्या एका मित्रासोबत दारू पिण्यास आशीर्वाद बारमध्ये आला होता .तेव्हा बार समोर जुन्या वादातुन मृतक अमोल पाटील व आरोपिंमध्ये झटापट झाली . तेव्हा आरोपींनी अमोलच्या डोळ्यात मिरची पूड टाकून डोक्यात धारदार शस्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले.  या घटनेचि तिवसा पोलिसांना माहिती मिळताच तिवसा पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रीता ऊईके , उपविभागीय  पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव व स्थानिक गुन्हे शाखेचे  विजय गराड, एस आय मूलचंद भांबुरकर ,सुनील केवतकर ,संतोष तेलंग , बळवंत दाभणे ,मंगेश लकडे , नितीन कळमकर  आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले  व घटना स्थळि तगडा बंदोबस्त तैनात करुन .मृतदेह शवविच्छेदना  करीता पाठविला . व ठाणेदार रीता ऊईके यांनी वेगाने चक्रे फीरवून काही तासातच चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजी पंत येथून अटक  केली .

मृतक अमोल पाटील यांचा वाळुचा व्यवसाय  होता . व एक बियर बार व वाईन शाॅपि ही होति .  तसेच आरोपि  प्रविण ढोबाळे याचा सुध्दा तिवसा येथे बार असुन वर्धा जिल्ह्यात दारुचि अवैध वाहतुक व बनावटि नोटा चलनात आनल्याचा त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल आहे .प्रविन ढोबाळे व अमोल पाटिल यांचा 2014 मध्ये गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या व्यवहारातून वाद झाला होता . 2017 मध्ये प्रवीण ढोबाळे व महेंद्र ठाकूर त्या दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात महेंद्र ठाकूर चा मृत्यू झाला होता. त्या हत्याप्रकरणात मृतक अमोल पाटील आरोपी होता . त्याला दीड महिन्यापूर्वीच तिवसा पोलिसांनी   दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई केली होती .परंतु त्याने विभागीय आयुक्त कार्यालयातून त्यावर स्थगिती मिळविली होति. सदर घटना प्लॅनिंग ने केली असून खून करत असताना आरोपी अविनाश पांडे यांनी आशीर्वाद बारमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते.

आरोपि विरुध्द 302,143,147,148 ,149 ,120, (ब), 34 कलमा नुसार गुन्हे दाखल केले असुन एक आरोपि अध्यापही फरार असल्याचि माहीति तिवसा पोलिस स्टेशन च्या पोलिस निरीक्षक रीता उईके , तसेच उप विभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव साहेब यांनि दिली.

मृतक अमोल पाटील यांचा अंतिम संस्कार रविवारी दुपारी चार वाजता तिवसा येथील हिंदू स्मशानभूमीत करण्यात आला .त्यांच्या अंत्ययात्रेत तालुक्यातील शिवसैनिक व नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. अमोल पाटील यांच्या घरापासून तर हिंदू स्मशानभूमी पर्यंत तगडा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

Leave A Reply

Your email address will not be published.