ब्रेकिंग: बीएचआर घोटाळ्याचा मुख्य संशयित सुनील झंवरला अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यभर गाजलेल्या  बीएचआर पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य संशयित असलेल्या  सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर सापळा रचून अटक केली आहे.  झंवरची अटक बीएचआर घोटाळयाच्या तपासाच्या दृष्टीने सर्वात महत्वपूर्ण मानली जात आहे. यामुळे  बीएचआर घोटाळयाविषयी अनेक पैलू उघड होण्याची शक्यता आहे.

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर त्याने पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण येत वॉरंट रद्द केले असून त्याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला मिळवून घेतला होता. भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर पाच मार्चला पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण आला. त्याने फरार घोषित होण्याचे वॉरंट रद्द करून घेतले होते.

zanvarसुनील झंवरला दोन मार्चला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून बचावासाठी १५ दिवसांचा दिलासा दिला होता. झंवर याने १५ दिवसांच्या आत पुण्याच्या सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून सुनावणीसाठी मुदत देण्यात आली. तर दुसरीकडे पुण्याच्या न्यायालयाने झंवर व कंडारे यांना फरार घोषित करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी घोषणापत्र जारी केले होते. या घोषणापत्रानुसार ३० दिवसांच्या आत म्हणजेच १४ मार्चपर्यंत दोघांना न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढले होते. या वॉरंटची मुदत येणाऱ्या आठवड्यात संपुष्टात आल्यानंतर दोघांना फरार घोषित करण्यात येणार होते, असे झाल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली असती. तत्पूर्वी झंवर याने पाच मार्च रोजी पुण्याच्या न्यायालयात स्वत: हजर राहून वॉरंट रद्द करून घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.