ब्राऊन शुगर प्रकरण; दोघांच्या कोठडीत वाढ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रावेर शहरातून जप्त केलेल्या ब्राऊन शुगर प्रकरणी अटकेत असणार्‍या दोन्ही आरोपींच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे.

मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेसह रावेर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत रावेर शहरातून तब्बल एक कोटी रूपयांची ब्राऊन शुगर जप्त केली होती. या प्रकरणी अख्तरी बानो अब्दुल रऊफ (रा. मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्‍हाणपूर) या महिलेला सुरूवातीला अटक केली होती. नंतर ब्राऊन शुगरचा पुरवठा करणारा मध्यप्रदेशातील संशयीत सलीम खान शेरबहादूर खान (रा. किटीयानी कॉलनी, मंदसौर, मध्यप्रदेश) यालाही अटक केली. दोन्ही संशयितांना सुरूवातीला २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना जळगाव विशेष न्यायालयात न्यायाधीश एम.बी. बोहरा यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची कोठडी २७ पर्यंत वाढवली.

Leave A Reply

Your email address will not be published.