भडगाव शहरातील मेन रोडने घेतला मोकळा श्वास

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव शहरात जुन्या गावात भरणारा बाजार पूर्ण पणे बंद होऊन मेन रोड रस्त्यावर भरण्यास सुरुवात झाली होती. लाखो रुपये खर्च करून बनविलेल्या रस्त्यावर व रुंदीकरणावर हाथगाड्यांनी ताबा घेतला होता, दुभाजक बंद केला होता. आज दि. २४ रोजी पहाटे पासून दिवसभर पालिकेचे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे दोन पथक या मेन रस्त्यावर उभे होते. अवैधपणे रस्त्यात दुकान लावणाऱ्यांना त्यांनी मज्जाव केला. ३५ व्यक्तींना नोटिसा व काहींना  समज देण्यात आली .

पहाटे पासून पालिकेचे पथक तैनात 

बाजारात उघड्यावर रस्त्यावर डिव्हायडरला अडथळा निर्माण करून लागणाऱ्या गाड्यांना पालिकेच्या वतीने मज्जाव करण्यात आला. त्यासाठी पालिकेच्या वतीने पहाटे पासून आवाहन करण्यात आले.  हा बाजार मेनरोड वर डिव्हाडरच्या बाजूला रस्त्यावर बाजार भरत असल्याने शुक्रवारी व इतर दिवशी रहदारीची मोठी समस्या निर्माण होते. पायी चालणाऱ्यांना देखील अडचण निर्माण होते. हा बाजार पुन्हा जुन्या बाजारात स्थायिक होऊन जुन्या बाजाराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणीही नागरिकांमधून होत आहे.

पालिकेने दोन पथक नेमून आज शुक्रवारी रस्त्यावर व डिव्हायडर वर भरणारा बाजार इतरत्र हलविण्यात आला. मुख्यधिकारी रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व पाणी पुरवठा अभियंता गणेश लाड, कर निरीक्षक अजय लोखंडे, स्वच्छता निरीक्षक तुषार लखवाल, आरोग्य लिपिक छोटू वैद्य, शिपाई दिलीप कोळी, शेख आसिम मणियार, चालक अविनाश पवार, सफाई कर्मचारी गोकुळ बोरसे, संदीप पाटील आदींच्या पथकाने काम पाहिले.

३५ दुकानदारांना नोटिसा 

जुन्या गावात जाण्यासाठी एकमेव असा मेन रोड हा अगोदर अरुंद रस्ता असल्याने त्यावर दुभाजक टाकून रुंद करण्यासाठी नगरपालिकेने मागील वर्षी अतिक्रमण काढले व स्वतःच्या जागांवर दुकाने उभी असलेल्या व्यापाऱ्यांनी नगरपरिषद ला सहकार्य करत अतिक्रमण स्वतःहून ते काढले. यानंतर रस्ता हा मोठा झाला. त्यावर दुभाजक टाकले. रस्ता रुंद झाला. मात्र दरम्यान सर्वांचे दुर्लक्ष झाले व बाजार पुन्हा मेन रोड रस्त्यावर भरण्यास सुरू झाला होता. येथील मेन रोड ट्राफिक व वर्दळने त्रस्त झाली होती. डीवाईडर असतानाही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व मध्यभागी बाजूने दुकाने बसत असल्याने या भागातून चालणे कठीण होते. याच भागात पोलिस स्टेशन व तहसील कार्यालय जुना तरवाडे रस्ता अशी चौफुली असल्याने वाहनांची मोठी गर्दी होते. मोठी ट्राफिक निर्माण होते. येथील बाजार पुन्हा इतरत्र हल्ल्याने येथील वर्दळ, हॉर्नचा गोंगाट, ट्रॅफिकची समस्या निदान आज सुटली आहे.

जुन्या बाजारात दूकानदारांना हक्काची जागा 

“जुना बाजारात पालिकेने रस्त्यावरील दुकांनांची व्यवस्था केली पाहिजे. मेन रोड वरील अडचणीच्या जागी वाहनांच्या वर्दळमधे जीव धोक्यात टाकून व्यवसाय करणाऱ्या लहान दूकानदारांना जुन्या बाजारात हक्काची जागा मिळेल व स्वाभीमानाने ते त्या ठिकाणी व्यापार व्यवसाय करू शकतील. म्हणून जुन्या बाजारात मेन रोड वरील दुकानदारांनी जागा सांभाळून पुन्हा या बाजाराला वैभव मिळवून देण्यासाठी पुढार्यांनी काम केले पाहिजे”. पालिकेने सहकार्य केले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.