बोडवल येथे निर्जंतुकीकरणाची फवारणी

0

बोदवड | प्रतिनिधी 

जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असून या कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शेलवड – साळशिंगी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई रामदास पाटील यांच्याकडून त्यांच्या या संपुर्ण गटात निर्जंतूकीकरण फवारणी करण्यात येत आहे.

जि.प.सदस्या सौ.पाटील यांच्या पुढाकाराने गटातील सर्व सार्वजनिक ठिकाणी निर्जंतूकीकरण फवारणी करण्यात येत आहे.तसेचं गटातील प्रत्येक गावातील गल्लीबोळात ही फवारणी केली जाणार आहे.

यावेळी तहसिलदार रविद्र जोगी यांनी स्वत:फवारणी करून जनतेला घरातचं रहा,सुरक्षित रहा असे आवाहन केले तर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती श्री.रामदास पाटील यांनी गावागावात ही फवारणी करतांना नागरिकांना शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्याचे तसेचं कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.