भडगाव तालुक्यात मार्चचा रेशनचा धान्य कोठा वाटप संपण्यात जमा एप्रील महीन्यात धान्य वाटप होणार.

0

 भङगाव | प्रतिनिधी

तालुक्यात एकुण ७२ रेशन दुकानदारांना भडगाव पुरवठा विभागामार्फत धान्य वाटप मार्च महीन्याचा मागील महीन्यातच झाला होता. त्यामुळे या मार्च महीन्याचा धान्य वाटप संपण्यात जमा आहे. आता एप्रील महीन्याचा धान्य कोठा वाटप सुरु असुन आतापर्यंत एकुण ५६ दुकानदारांंना भडगाव येथील शासकीय धान्य गोडाउनमधुन धान्य वाटपाचा कोठा वाटप करण्यात आला आहे. त्यामुळे भडगाव तालूक्यात १ एप्रील नंतर रेशनचे धान्य वाटप सुरु होणार आहे. अशी माहीती तहसिल कार्यालयाचे पुरवठा अधिकारी किशोर महाले यांनी दिली.

याबाबत माहीती अशी कि, तालुक्यात रेशन दुकानदारांना मार्चचा धान्य कोठा मागील महीन्यातच वाटप करण्यात आला आहे. बहुतांश रेशन दुकानदारांनी ज्वारी, गहु, तांदुळ असे धान्य वाटप केलेले आहे. तुरळक रेशन धान्य वाटप सुरु आहे. तसेच तालुक्यात एप्रील महीन्याचा रेशन धान्य कोठा वाटपासाठी २० मार्च ला चलन व परमीट दिले आहेत. तालुक्यातील एकुण ७२ रेशन दुकानदारांपैकी आतापर्यंत ५६ रेशन दुकानदारांना येथील शासकीय धान्य गोडाउनमधुन धान्य वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत रेशन दुकानदारांना धान्य वाटप सुरु आहे. यात ज्वारी, गहु, तांदुळ असे धान्य ग्राहकांना मिळणार आहे. मागील महीन्यात अंत्योदय कार्डला साखर वाटप करण्यात आली होती. आताही शासनाने साखर उपलब्ध करुन देण्याची नागरीकांची मागणी आहे. तालुक्यात एकुण ७२ रेशन धान्य दुकाने आहेत. अंत्योदय कार्ड संख्या ७२९६ इतकी आहे. प्राधान्य कुटुंब कार्ड संख्या १८१६७ इतकी आहे. रेशन दुकानात धान्य ई पाॅस मशीनने वाटप करण्यात येते. आॅनलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्यात येते. वाढीव कोठाबाबत प्रशासनास काही पञ वगैरे प्राप्त नसल्याचीही माहीती पुरवठा विभागामार्फत देण्यात आली. तरी काही प्रमाणात रेशन धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. सध्या कोरोनाच्या पाश्वभुमिवर राज्यात संचार बंदी लागु असल्याने नागरीक व परीवार घरातच बसुन आहेत. २१ दिवसाचा हा खेळ चालणार असुन पुढे तारखा वाढुही शकता. तरी शासनाने तालुक्यात लागेल त्याला धान्य उपलब्ध करुन दयावे. शेतमजुर, शेतकर्यांना घरी बसुन राहण्यामुळे हाताला काम नाही. त्यामुळे हातात पेसा नाही. तरी तालुक्यात रेशनचे धान्य कोठा वाढवावा. तसेच धान्य वाटप सुरु करावी. अशी मागणी भङगाव तालुक्यातील नागरीकातुन होतांना दिसत आहे.  कोरोना पाश्वभुमिवर भडगाव तहसिल कार्यालयात नुकतीच आमदार किशोर पाटील यांनी अधिकार्यांच्या बैठकीत रेशनचा २ ते ३ महीन्याचा रेशनचा कोठा रेशन दुकानदारांना मिळाल्यास नागरीकांनाही २ ते ३ महीन्यांचा धान्य मिळु शकेल. याबाबत शासनाकङे आपण मागणी मांडू असे सांगीतले होते. हा निर्णय झाल्यास नागरीकांसह गोरगरीबांना मोठी सोय होउ शकते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.