बेकायदेशीर बायोडिझेलची वाहतूक; एकावर गुन्हा दाखल

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ यावल रोडवर बेकायदेशीर बायोडिझेल वाहतुक करतांना आढळून आल्याप्रकरणी यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन अशा प्रकारे बेकायद्याशीर बायोडीझल विक्री करणाऱ्यांवर ही पोलीसांनी केलेली दुसरी कारवाई आहे.

यावल भुसावळ रोडवरील महाराष्ट्र गुजरात ढाब्यासमोर १० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास (एमएच ४८ टी १७८३) क्रमांकाचा ट्रकमध्ये बेकायदेशीर बायोडिझेल घेवून जात असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीसांना मिळाली. त्यानुसार पथकाने धडक कारवाई करत बायोडिझेल ट्रक ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पोलीस कारवाई करत असल्याची माहिती संशयित आरोपी शेरखान जुबेर खान रा. काजीपूरा ता. यावल याला मिळाल्याने ट्रक सोडून पसार झाला आहे. पोलीसांनी अंदाजे ९० हजार रूपये किंमतीचे बायोडिझेल आणि ट्रक असा एकुण ३ लाख ९० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पो.कॉ. सुशिल घुगे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी  शेरखान जुबेर खान याच्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खंडबहाले करीत आहे. यावल तालुक्यात आणखी काही ठीकाणी अशा प्रकारे बेकायद्याशीर बायोडीझलची विक्री करण्यात येत असल्याची चर्चा असुन, याबाबत चौकशी करून अशा बायोडीझल विक्री करणाऱ्यांवर देखील कार्यवाही व्हावी अशी मागणी होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.