बुलडाणा जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असो.चे कोरोना चाचणी शिबिर संपन्न

0

खामगाव (गणेश भेरडे)ः- शहरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने बुलडाणा जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशनच्या वतीने राज्य सचिव अनिलभाऊ नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.बाबासाहेब फैजपूरकर सभागृह केमिस्ट भवन नटराज गार्डनसमोर येथे 26 व 27 मार्च रोजी कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात सुमारे 300 जणांची रॅपिड कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये केमिस्ट व ड्रगिस्टसह कर्मचारी, व्यापारी व नागरिकांचा समावेश होता. भविष्यातील धोका टाळण्यासाठी तसेच कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची नितांत गरज असताना संघटनेच्या वतीने सदर उपक्रम राबविण्याबाबत पुढाकार घेण्यात आला. यासाठी डॉ.संजय चहाण, डॉ.अमोल अढाव, डॉ.अतिमा गवई, डॉ. प्राची निचळ, असो.चे अमरावती झोनचे संघटन सचिव रामचंद्र आयलाणी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नहार, कोषाध्यक्ष जगदीश नावंदर, खामगाव शहर अध्यक्ष अजय जैन, सचिव नंदकिशोर कांडेकर , कोषाध्यक्ष गणेश चांडक व पदाधिकारी तसेच गजानन निमकर्डे, जावेद खान, सुरेश थारकर, ओम राठी, शितल नहार यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.