जिल्ह्यात आज ११२४ नवे बाधित रुग्ण आढळले ; तर पुन्हा १५ रुग्णांचा मृत्यू

0

जळगाव । जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून आज जिल्ह्यात ११२४ नवे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहे. तर आज पुन्हा १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातजळगाव शहरातील पाच रूग्णांचा समावेश आहे

जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. आज दिवसभरात ११२४ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक जळगाव शहरात ४०० रुग्णांचा समावेश आहे. यामुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग आता धोक्याच्या पातळीवर पोहचल्याचे दिसून येत आहे.  दरम्यान, आजच ९०१ रूग्ण बरे देखील झाले.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- ४००, जळगाव तालुका-२७; भुसावळ-१२३; अमळनेर-१५; चोपडा 256, पाचोरा-२९; भडगाव-००; धरणगाव-४८; यावल-०३; एरंडोल-२८; जामनेर-४८; रावेर-२९; पारोळा-३४; चाळीसगाव-४०; मुक्ताईनगर-२०; बोदवड-२२; इतर जिल्ह्यातील-२ असे रूग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.