बारामतीतून भाजपाचे रासप आमदाराच्या पत्नीला तिकीट

0

मुंबई :- भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री उशिरापर्यंत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु होती. या बैठकीत अनेक उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून यादीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध कांचन कुल असा मुकाबला होणार आहे.

आमदार राहुल कुल रासपचे आमदार असले तरी मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुल यांची जवळीक वाढली होती त्यामुळे कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा आहे. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये मागच्या निवडणुकीत भाजपाला साथ देणाऱ्या महादेव जानकर यांना डच्चू देत मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहे. एकीकडे रासप आमदारांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली तर दुसरीकडे महादेव जानकर यांना बारामतीतून तिकीट नाकारले.

दोन महिन्यांपूर्वी बोलत असताना महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून आपण पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं जाहीर केलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत रासपने पाच जागांची मागणी केली होती. या जागांमध्ये त्यांनी बारामतीसह नगर दक्षिण मतदारसंघही मागितला होता. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर जानकर यांनी भाजपला दोन जागांचा प्रस्ताव दिला होता. नगरमध्ये बोलत असताना त्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही जाहीर करून टाकलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.