पाचोऱ्यात तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी

0

पाचोरा :- पाचोरा येथे तालुका, शहर, युवा मोर्चा व महिला संघटनेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळील शिवसेना कार्यालयाच्या प्रांगणात आमदार किशोर पाटील, माजी नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजा व माल्यार्पण करून शिवजयंती साजरी केली. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, आशिर्वाद इंन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दिकर, अँड. दिनकर देवरे, नगरसेवक सतिष चेडे, रहेमान तडवी, आनंद पगारे, वाल्मिक पाटील, दत्ता बोरसे, किशोर बारावकर, भरत खंडेलवाल, सुधाकर महाजन, अशोक महाजन, युवा सेनेचे अजय जैस्वाल, जितेंद्र पेंढारकर, योगेश पाथरवट, सुनिल शर्मा, पप्पु जाधव, नितीन चौधरी, स्विय्य सहाय्यक राजु पाटील, बंडु सोनार, दिपक पाटील, वैभव राजपुत, महिला सेनेच्या सुनिता बारावकर, सुनिता महाजन, किरणताई पाटील, श्रध्दा पाटील, कल्पना पाटील, मंदाकीनी पाटील, यांनीही शिवजयंती उत्सवात सहभाग घेतला. यानंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.