बस प्रवाशाचा प्रामाणिकपणा : सापडलेले पैसे केले भडगाव पोलिस स्टेशनला जमा

0

पोलिस  निरीक्षकांनी केले कौतुक

भडगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव येथून भडगावकडे बसमध्ये येत असताना कजगाव जवळ बस चेकिंग झाली. यावेळी सिटवर बसलेले प्रवासी यांना खाली तीन हजार रुपये सापडले. ही बाब त्यांनी बसमधील प्रवाश्यांना विचारले त्यांनी नकार दिल्याने भडगाव पोलिस स्टेशनला येऊन पोलिस निरीक्षक यांना सांगितली असता त्यांनी कुणाचे असतील त्याने घेऊन जावे असे आवाहन केले.

या बाबत अधिक असे की, भडगाव येथील माजी मुख्याध्यापक शैलेश दिनकरराव चव्हाण हे सकाळी भडगाव येथून चाळीसगाव येथे खाजगी कामानिमित्त गेले होते. ते काम आटोपल्यानंतर शैलेश चव्हाण हे चाळीसगाव येथून भडगाव कडे जाणारी बस क्र. ४४९ मध्ये सायंकाळी सहा वाजता बसले व पुढे कजगाव पर्यंत आले. कजगाव च्या पुढे बस चेकर यांनी थांबविली व बस चेक करत असताना एकाजवलून बस तिकीट हरवले व ते तिकीट कुठे पडले असेल ते पाहताना शैलेश चव्हाण यांना खाली पडलेले तीन हजार रुपये सापडले. या वेळी त्यांनी प्रवाश्यांना विचारले असता सर्वांनी नकार दिला. व भडगाव येथे बस स्टँडवर आल्यानंतर ते उतरले व आता काय करायचे असे म्हणत थेट भडगाव पोलिस स्टेशन गाठले व पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांना सर्व माहिती सांगितली. या वेळी पोलिस निरीक्षक यांनी ज्याचे कुणा प्रवाष्याचे पैसे नजर चुकीने पडले असतील त्यांनी भडगाव पोलिस स्टेशन ला येऊन आपले पैसे घेऊन जावे असे आवाहन करीत माजी मुख्याध्यापक शैलेश चव्हाण यांचे कौतुक करून असे प्रमानिक्तेचे अनुभव आज आला असून असे लोकांची आज गरज आहे असे. पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.