वेळोदे येथे मृत बिबट्या आढळल्याने खळबळ !

0

प्रतिनिधी | चोपडा

तालुक्यातील वेळोदे शिवारातील विपीन वल्लभदास गुजराथी यांचा मालकीचे शेत साहेबराव केशव बागुल हे करीत असलेल्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळल्याने परिसरात घबराटीचे वातावरण झाले आहे.

तालुक्यातील वेळोदे शेत शिवारातील विपीन वल्लभदास गुजराथी यांचा मालकीचे शेत साहेबराव केशव बागुल हे करीत असलेल्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळल्याने आज दुपारी बारा वाजता वेळोदे गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

सकाळी या शेतातील कामासाठी असलेला बहादूर पावरा हा बारा वाजता कामावर गेला असता कपाशीच्या शेतात मृत अवस्थेतील बिबट्या त्याला दिसून आला होता घाबरलेल्या अवस्थेत आपल्या मालकाला आणि पोलीस पाटीलला सदरील माहीती सांगितली. त्यानुसार पोलीस पाटील मिलिंद करणकाळे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन, व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना  कळविले होते.वनविभागाचे अधिकारी तात्काळ हजर झाले होते.त्यात सहायक वनसंरक्षक व्ही.एच.पवार, वनक्षेत्रपाल पी.बी.पाटील,

वनरक्षक के.एल.धनगर  वनरक्षक डी. बी.देवरे,दीपिका पालवे,पी.एस.सोनवणे,

दीपिका पालवे , गोकुळ गोपाल,गोविंदा पाटील, तसेच जळगाव येथील वन्यजिव अभ्यासक विवेक देसाई ह्यांनी सुद्धा आदीनी घटनास्थळी पोहचले होते.

या बिबट्याने दोन दिवसांपूर्वी गावातील धर्मासिंग छोटू पावरा यांच्या गायीचा फडश्या पडला होता ती गायचे मास दुसऱ्या दिवशीही ह्या बिबट्याने खाल्ले असावे आणि यातूनच त्याला विषबाधा झाली असावी आणि तो मृत झाला असावा असे मत व्ही एच पवार यांनी सांगितले.कारण त्या गायीला मारल्या पासून अवघ्या २१० ते २२० किलोमीटर अंतरावर ही घटना झाली आहे. आणि रात्री १२ नंतरची घटना असावी असा कयास धरला जात आहे .जवळपास ४ वर्षांचा हा बिबट्या असून पुढील तपास पंचनाम्या द्वारे होईल असे सहा.वनसंरक्षक व्ही. एच. पवार यांनी सांगितले. तसेच तीनही डॉक्टर समितीचा आवाहल मागविला जाईल असेही त्यांनी सांगितले. यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक मोराणकर हे सुध्दा भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.