“फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव ; खडसेंनी पुन्हा साधला फडणवीसांवर निशाणा

0

जळगाव | विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला धोबीपछाड मिळाल्याने इथली जागा गमावावी लागली आहे. शिवाय औरंगाबादमध्येही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही, असं म्हणत खडसे यांनी  देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीच्या एकीचे हे प्रदर्शन झाले आहे. भाजपचे नेतृत्व कमी झाले आहे. पक्षात हम करे सो कायदा होता, म्हणून हा पराभव झाला, अशी टीका खडसेंनी केलीये.

लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे. असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेहमी म्हणतात, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही, आम्ही हिमालयात जाऊन बसू, यांच्या नुसत्या गप्पा असतात, असा टोला खडसेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.