भुसावळात डंपरच्या धडकेत बुलढाणा येथील पती-पत्नी जागीच ठार ; खडका चौफुली येथील घटना

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील खडका चौफुलीवर वेगाने येणाऱ्या डंफरने मोटरसायकल क्रमांक एम.एच २८ ए.एल.६६७१ हिस जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल स्वार चंद्रकांत जगन्नाथ वराडे व त्यांच्या सोबत असलेली त्यांची पत्नी संध्या चंद्रकांत वराडे हे जागीच ठार झाले.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे फेटल दाखल करण्यात आले असून सदर धडक देणारे डंपर व त्यावरील चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरात खडका चौफुली येथे आज शुक्रवार  ४ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान वरणगाव कडून भरधाव वेगाने डंपर क्रमांक एम.एच १९ झेड. ३१९२ वरील चालकाने भरधाव वेगात येऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणारी मोटरसायकल क्रमांक एम.एच २८ ए.एल.६६७१ यावरील चालक चंद्रकांत जगन्नाथ वराडे वय ६५ व त्यांची सोबत असलेली त्यांची पत्नी संध्या चंद्रकांत वराडे वय ५० दोघ जोरदार फेकले गेले व डंपरच्या खाली आल्याने जागीच ठार झाले.

तापी लेआऊट चिखली रोड बुलढाणा येथील दाम्पत्य असून भुसावळ मधील त्यांचे नातेवाईक

शंकर हरी किनगे यांच्या घरी गुरुवार दिनांक ३ रोजी रात्री मुक्कामी होते.  ४ रोजी सकाळी अनिल ज्ञानदेव धांडे राहणार गडकरी नगर यांचे घरी हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असतांना खडका चौफुली भुसावळ येथे आले असता त्यांना  डंपरने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी अनिल ज्ञानदेव धांडे राहणार गडकरी नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम ३०४ (अ),२७९,३३८ मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे डंफर चालक महेंद्र ब्रिजलाल कोळी राहणार भोरटेक तालुका यावल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळाची बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत व सपोनि गणेश धुमाळ यांनी पाहणी केली .

Leave A Reply

Your email address will not be published.