प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर ; बघा काय म्हणाल्या…

0

नवी दिल्ली :- बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या एका प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी थेट मराठीत उत्तर देत लोकसभेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लोकसभेत प्रीतम मुंडे यांनी मराठवाडा आणि विशेष: बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी अशी मागणी केली. यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रीतम मुंडे यांनी इंग्रजीत स्मृती इराणी यांना प्रश्न विचारला होता. उत्तर देताना स्मृती इराणी यांनी मराठीत उत्तर देत मी महाराष्ट्राचीच असल्याचं सांगितलं.


‘मी महाराष्ट्राचीच असून मलादेखील शेतकऱ्यांच्या समस्या माहिती आहेत’, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं. यावेळी स्मृती इराणी यांनी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासनही प्रीतम मुंडे यांना दिलं. महिला आणि बालकल्याण विभागासह वस्त्रोद्योग खातंही स्मृती इराणी यांच्याकडेच आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.