कळमसरा येथे नाल्यात वाहून गेल्याने एक बेपत्ता

0

पाचोरा :- तालुक्यातील लोहारा येथून जवळच असलेल्या कळमसरा  येथे दि.२८ रोजी अत्यन्त अवकाळी पाऊस झाल्याने दुपारी ४ वाजेच्या सुमारास  नाल्याना पुर येऊन एक जण  वाहून जाऊन बेपत्ता झाला आहे.कळमसरा येथील तरुण शेतकरी गजानन वाघ वय (२८) हे शेतातून घरी येत असताना नाल्याला अचानक पाणी वाढल्यामुळे पुरात वाहून गेले आहेत. ही घटना २८ रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. लोहारा आणि परिसरात दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान कळमसरा-लोहारा शिवारात जोरदार पाऊस झाला. या पावसाने लहान नदी-नाल्याना पूर आले.अचानक जोरदार पाऊस आल्याने शेतकरी वर्गासह शेतमजूराचीही भंबेरी उडाली. तसेच सोन नदीलाही चांगलेच पाणी आलेले होते. तसेच लोहारा आणि कळमसरा शिवारातील नाले भरून वाहत होते. दरम्यान

संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास तरुण शेतकरी  गजानन वाघ व त्यांचे चुलत काका सीताराम वाघ हे शेतातून बैलगाडी सह घरी येत असताना रस्त्यात असणाऱ्या  नाल्याला  अचानक पाणी वाढले. त्यामुळे सहकारी सीताराम वाघ, गाडी बैल व एक गोरा पाण्यात वाहू लागले. गाडी बैलाची दुसर मोडल्याने बैलांचे प्राण वाचले, तर सिताराम वाघ यांच्या हाती एका झाडाची मुळे लागल्याने ते काठाला लागून त्यांचेही प्राण वाचले. परंतु यात गोरा (बैल) मरण पावला असून गजानन वाघ मात्र अजूनही बेपत्ता असल्याचे कळते. गावकरी व शासकीय यंत्रणा त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.पाचोरा तहसिलदार कैलास चावडे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील हे स्वतः घटनास्थळी हजर होते. रात्ररी उशिरा पर्यत शोध कार्य चालू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.