जात वैधता प्रमाणपत्रासाठी ४० हजार रुपयाची लाच ; तीन जणांना अटक

0

जळगाव – जात वैधता प्रमाणपत्रासाठी तब्बल ४० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या तीन जणांना जळगाव अँटीकरप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. अत्यंत गोपनीयरीत्या पथकाने तिघाही आरोपींच्या बुधवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री 12 वाजेदरम्यान टप्प्याटप्प्याने मुसक्या आवळल्या.

याबाबत सविस्तर असे कि, हिंदी सेवा मंडळ यांच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय भुसावळ संस्थेतील कर्मचारी घनश्याम रामगोपाल टेमाणी (वय ४० रा.भुसावळ, वरिष्ठ लिपिक) याने एका विद्यार्थ्याला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ४० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान, संबंधित विद्यार्थ्याने याबाबत जळगाव अँटीकरप्शन या विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर अँटीकरप्शन विभागातील पथकाने सापळा रचून घनशाम टेमाने यांना ३ जुलै रोजी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारत असतांना रंगेहात पकडले.

या प्रकरणात टेमाने यांना मदत करणारे ललित खुशाल किरंगे (वय 42, रा. भुसावळ), ललित वाल्मीक ठाकरे (वय 39), यांच्यासह तिघांना अँटीकरप्शन विभागाने अटक केली आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस उपाध्यक्ष जीएम ठाकूर पोलीस निरीक्षक निलेश लोधी,सहायक फौजदार रवींद्र माळी,पो.ना. मनोज जोशी,जनार्दन चौधरी, पो.काँ.प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, महेश सोमवंशी,नसीर देशमुख,ईश्वर धनगर यांनी ही कारवाई केली

Leave A Reply

Your email address will not be published.