पीपल्स बँकेच्या अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव :- जळगाव पीपल्स बँकेच्या अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री साडेसात वाजता अयोध्यानगरात घडली. रजनीकांत सुभाष सोनवणे (वय २७ ) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे की, रायपूर कंडारी येथील रहिवासी असलेले रजनीकांत हे तीन वर्षापासून पीपल्स बँकेच्या चोपडा शाखेत वरिष्ठ बँक अधिकारी म्हणून काम करीत होता.दीड महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. तो आपल्या पत्नीसह अयोध्यानगरात राहत होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याने गळफास लागून आत्महत्या केली. आत्महत्या केली त्यावेळेस तो एकटाच घरी होता. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. त्याच्यामागे पत्नी, आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.