प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत महिला कार्याध्यक्ष नियुक्तीचे स्वागत – देवेंद्र मराठे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

काँग्रेसने पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल अशा महत्वाच्या पदावर महिलांना संधी दिली. महिलांना राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्याची काँग्रेसची परंपरा आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग आणखी सक्रीय व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेऊन प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महिलांचा सन्मान केला असे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी सांगितले.

यासंदर्भात मराठे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णयही काँग्रेस सरकारनेच घेतला. आताही उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी घेतला काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत ४० टक्के महिलांना उमेदवारी दिली. ‘लडकी हूँ’ लड सकती हूँ’, अशी घोषणा देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्रालाही मोठी परंपरा असून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्थानिक पातळीवर महिलांना जास्तीत जास्त संधी देऊन त्यांचा राजकारणातील व निर्णयप्रक्रियेतील सहभाग आणखी वाढावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे म्हणाले जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने या निर्णयाचे स्वागत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.