पेट्रोल-डिझेल आज स्वस्त की महाग, जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा इंधन दरात कोणताही बदल केला नाही. देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी इंधन दर स्थिर ठेवले. पेट्रोल आणि डिझेल दरात सलग दहाव्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलची किंमत ही 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची १६ वेळा वाढ झाली. या दरवाढीने पेट्रोल ४.७४ रुपयांनी महागले तर डिझेल ४.५२ रुपयांनी महागले होते. नुकताच सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली होती.

 

पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. आज मंगळवारी मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१७ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे.

 

कोलकात्यात आज पेट्रोल ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.७६ रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९९.२१ रुपयांवर स्थिर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.